Download HinduNidhi App
Lakshmi Ji

ॐ नमो आद्यरूपे – महालक्ष्मीची आरती

Om Namo Aadyarupe Mahalaxmichi Aarti Marathi

Lakshmi JiAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ ॐ नमो आद्यरूपे – महालक्ष्मीची आरती ॥

देवी भगवती माते ॥
काळिका कामरूप ।
शक्ति तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया ।
मूळपीठ देवते ॥
झालिया भेटी तूझी ।
नीवारिसी पापंतें ॥

जय श्रीकुलदेवते ।
महालक्ष्मी ग माते ।
आरती घेउनीयां ।
ओंवाळीन मी तूतें ॥

अंबिका भद्रकाली ।
देवी आद्या कुमारी ॥
मारिलें चंडमुंड ।
महिषासुर हे वैरी ॥
हर्षले देवद्विज ।
गाती जयजयकारी ॥
उजळुनी दीपमाळा ।
ओंवाळीती नरनारी ॥

जय श्रीकुलदेवते…

परिधान हेमवर्ण ।
कंठीं नवरत्नें हार ॥
करतळे रातोत्पळें ।
अद्भुत जयजयकार ॥
अवतार कोल्हापुरी ।
केला प्रताप थोर ॥
मारिले दैत्य बिकट ।
अघट कोल्हासुर ॥

जय श्रीकुलदेवते…

नासिकीं मुक्ताफळ ।
रत्नकुंडलें श्रवणीं ॥
घवघवीत नेपुरें हो ।
अंदु वाजती चरणीं ॥
मस्तकीं पुष्पहार ।
दिसे भासे वदनीं ॥
पौर्णिमाचंद्रबिंब ।
पृष्ठीवरी रुळे वेणी ॥

जय श्रीकुलदेवते…

नवकोटी कात्यायनी ।
चतुःषष्टी योगिनी ॥
भूचरां जलचरों ।
आई तुजपासुनी ॥
ऐसी तूं महालक्ष्मी ।
जगताची जननी ॥
नामया विष्णुदासा ।
तुझे चिंतन ध्यानी ॥

जय श्रीकुलदेवते…

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
ॐ नमो आद्यरूपे - महालक्ष्मीची आरती PDF

Download ॐ नमो आद्यरूपे - महालक्ष्मीची आरती PDF

ॐ नमो आद्यरूपे - महालक्ष्मीची आरती PDF

Leave a Comment