|| आरती ||
जयदेव जयदेव आदिशंकरा श्री आदिशंकरा
अज्ञानासि हरुनि उद्धरिसी जगता जयदेव जयदेव ॥ध्रु०॥
जगती झाले थोर ज्ञानावतार
व्यासांनंतर प्रकटे आदिशंकर
भाष्यकारा पुसतु ज्ञानेश्वर बोले
ब्रह्मानंदी डुंबून वारकरी चाले
जयदेव जयदेव …….. ॥१॥
नस्तिक मत करिती श्रुतिमत उध्वस्त
त्यांचे खंडन करुनि स्थापिसी वेदांत
अज्ञानाने जगती पडल्या ज्या रुढी
मोडुनि सांगसी सर्वा ज्ञानाची प्रौढी
जयदेव जयदेव …….. ॥२॥
स्तोत्रे सुंदर रचुनी सामान्यांसाठी
भक्तिमार्गी त्यांची रुचि तू वाढविसी
चित्तशुद्धी साधुनि पावती सन्मार्गा
सामान्यासही ज्ञानबोध तूं केला
जयदेव जयदेव …….. ॥३॥
ज्याचेपासुनि उगवे ज्ञानाचा स्त्रोत
गुरु त्यासी मानावे पुसूं नये जात
काशीक्षेत्री रचुनि मनीषापंचक
सर्वांसाठी केला अद्वैतबोध
जयदेव जयदेव …….. ॥४॥
Found a Mistake or Error? Report it Now