॥ अयोध्या पुरपट्टण – रामचंद्राची आरती ॥
अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरी ।
अवतरले श्रीराम कौसल्येउदरी ॥
स्वानंदे निर्भर होती नरनारी ।
आरति घेउनि येती दशरथमंदीरी ॥
जय देव जय देव जय श्रीरामा ।
आरती ओवाळू तुज पूर्णकामा ॥
पुष्पवृष्टी सुरवर गगनीहुनि करिती ।
दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीती ॥
अप्सरा गंधर्व गायने करिती ।
त्रिभुवनी आल्हादे मंगले गाती ॥
जय देव जय देव जय श्रीरामा…
कर्णी कुंडल माथा मुकुट सुविराजे ।
नासिक सरळ भाळी कस्तुरी साजे ॥
विशाळ सुकपोली नेत्रद्वय जलजे ।
षट्पदरुणझुणशब्दे नभ मंडळ गाजे ॥
जय देव जय देव जय श्रीरामा…
रामचंद्रा पाहता वेधलि पै वृत्ती ।
नयनोन्मीलन ढाळू विसरली पाती ॥
सुरवर किन्नर जयजयकारे गर्जती ।
कृष्णदासा अंतरी श्रीराममूर्ती ॥
जय देव जय देव जय श्रीरामा…
Read in More Languages:- hindiआरती: श्री रामचंद्र जी
- hindiरघुवर श्री रामचन्द्र जी आरती
- marathiरत्नांची कुंडले – रामचंद्राची आरती
- marathiजय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती
- marathiत्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती
- marathiउत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती
- marathiश्री रामाची आरती
- englishShri Ram Ji Ki Aarti
- hindiश्री राम जी की आरती
- gujaratiરામ જી આરતી
- englishShri Ram Aarti
- hindiश्री राम आरती
Found a Mistake or Error? Report it Now