जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती
॥ जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती ॥ जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ॥ नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे । जय देव जय देव जय आत्मारामा… बहुरूपी बहुगुणी बहुता…