Shri Ganesh

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें​ आरती

Nana Parimal Durva Shendur Shamipatre Gnapati Aarti Marathi Lyrics

Shri Ganesh ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें​ आरती Marathi PDF ||

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।

शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें​ आरती PDF

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें​ आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App