Download HinduNidhi App
Shri Ganesh

नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती

Nanaparimal Durva Ganpatichi Aarti Marathi

Shri GaneshAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती ॥

नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते ॥
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रे ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापे विघ्नेही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती..

शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी ।
कीर्ति तयांची राहे जोवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यो ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती..

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download नानापरिमळ दूर्वा - गणपतीची आरती PDF

नानापरिमळ दूर्वा - गणपतीची आरती PDF

Leave a Comment