Lakshmi Ji

वैभव लक्ष्मी व्रत कथा मराठी

Vaibhav Laxmi Vrat Katha Puja Vidhi Marathi

Lakshmi JiVrat Katha (व्रत कथा संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

|| वैभव लक्ष्मी व्रत कथा (Vaibhav Laxmi Vrat Katha Marathi) ||

एक काळ होता, जेव्हा आटपाट नगरात प्रेम, आपुलकी, नामस्मरण, कीर्तन, सेवा आणि परोपकार यांनी लोकांचे जीवन भरलेले होते. लोक गुण्यागोविंदाने राहत होते. पण काळाच्या बदलासोबत समाजात चोरी, दरोडे, जुगार, व्यभिचार, मद्यपान यांसारख्या दुर्गुणांनी पाय पसरले. तरीही काही चांगली, सज्जन माणसे त्या नगरात होती. त्यात शीला आणि तिचा पतीही होते – धर्मनिष्ठ, शांत आणि समाधानी.

शीला आपल्या संसारात सुखी होती. पण नशिबात काही कठीण काळ लिहिला असावा. तिच्या पतीला वाईट संगत लागली. एकाच रात्रीत श्रीमंत होण्याच्या हव्यासाने त्याने चुकीच्या मार्गाचा स्वीकार केला आणि शेवटी भिकारी झाला. व्यसनांच्या आहारी गेलेला नवरा जुगार, सट्टा, मादक द्रव्यांमध्ये सर्व काही गमावून बसला. त्याने शीलाचे दागिनेही गमावले.

शीला मात्र सुसंस्कृत, सुस्वभावी स्त्री होती. तिने हे सगळं धीराने सहन केलं आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून भक्ती करत राहिली.

दैवी भेट

एके दिवशी दुपारी, चिंतेने भरलेल्या मनाने शीला घरी बसली होती. तेव्हा एक वृद्ध माता दाराशी आली. ती माता तेजस्वी आणि प्रेमळ होती. शीला तिचं स्वागत करून तिला घरात घेऊन आली. त्या मातेला पाहताच शीला प्रसन्न झाली.

मातेने विचारले, “मला ओळखलेस का?” शीला संकोचली आणि म्हणाली, “माते, मला तु ओळखीची वाटतेस, पण नक्की आठवत नाही.”

माता हसून म्हणाली, “लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनात आपण भेटायचो.” नवऱ्याच्या वाईट वागणुकीमुळे शीला मंदिरात जाणं बंद झालं होतं. मातेने तिची विचारपूस केली आणि प्रेमाने धीर दिला.

शीला रडत म्हणाली, “माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आहे. नवऱ्याच्या व्यसनांमुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत.”

माता म्हणाली, “बाळ, दुःख हीसुद्धा आयुष्याचा एक भाग आहे. पण धीर सोडू नकोस. लक्ष्मी मातेचं ‘वैभव लक्ष्मी व्रत’ कर. ती कृपावंत आहे. तिचं व्रत भक्तीने केल्यास सर्व दुःख दूर होते.”

व्रताची महती आणि विधी

  • मग मातेने संपूर्ण व्रताची माहिती दिली:
  • हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावं.
  • सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं.
  • दिवसभर संयम राखावा – खोटं बोलू नये, कोणालाही दुखवू नये.
  • संध्याकाळी दिवा लावून पूर्वेकडे तोंड करून बसावं.
  • एका पाटावर लाल रुमाल अंथरून त्यावर तांदळाची रास करावी. त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा.
  • त्या तांब्याच्या वर वाटीत एक दागिना किंवा एक रुपयाचे नाणे ठेवावे.
  • फुलं, उदबत्ती, गोड पदार्थ अर्पण करून पूजा करावी.
  • ‘जय श्री लक्ष्मी माता’ हा जप ११ वेळा करावा.
  • नंतर प्रसाद वाटावा, आणि तांदूळ पक्ष्यांना टाकावेत, पाणी तुळशीला ओतावं.
  • मग शीला म्हणाली, “हे व्रत किती वेळा करावं आणि कसं पूर्ण करावं?”
  • माता म्हणाली, “हे व्रत ११ किंवा २१ शुक्रवारी करावं. शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करावं. त्या दिवशी गोड पदार्थ करावा, आणि ७ किंवा ११ सुवासिनींना/कुमारिकांना व्रताची पुस्तिका द्यावी.”
  • शेवटी माता म्हणाली, “मनापासून प्रार्थना कर – गरीबांना संपत्ती, संततीहीनांना संतती, सौभाग्यवतींचं सौभाग्य, कुमारिकांची इच्छा पूर्ण होवो.”
  • शीला भावूक झाली. तिने मनात ठरवलं – “मातेच्या सांगण्यानुसार व्रत पूर्ण पद्धतीने करीन.” पण डोळे उघडल्यावर ती माता तिथे नव्हती. शीला समजून गेली की ही माता दुसरी कोणी नव्हे तर स्वतः लक्ष्मी माता होती.

व्रताचा प्रभाव

दोन दिवसांनी शुक्रवार आला. शीला लवकर उठून, सर्व विधीपूर्वक व्रत करू लागली. तिने एक रुपयाचं नाणं ठेवून व्रत केलं. नवऱ्याला प्रसाद दिला. त्याच्या स्वभावात लगेचच बदल झाला. तो पुन्हा प्रेमाने वागू लागला. व्यसनं त्याने सोडली आणि कामाला लागला.

शीलेने श्रद्धेने २१ शुक्रवार व्रत पूर्ण केलं आणि शेवटी उद्यापनही शास्त्रोक्त पद्धतीने केलं. तिने सात सुवासिनींना व्रत सांगितलं आणि पुस्तिका दिली.

“हे लक्ष्मी माते, मी भक्तीभावाने व्रत पूर्ण केलं आहे. कृपया सर्वांचे कल्याण कर. गरिबांना धन, संततीहीनांना संतान, कुमारिकांना मनाप्रमाणे वर मिळू दे. सर्वांचे जीवन सुखमय कर.”

व्रताच्या प्रभावाने तिच्या आयुष्यात पुन्हा वैभव आलं. नवरा सुधारला. घरी आनंद, पैसा, समाधान पुन्हा परतलं. तिच्या शेजारणींनीही हे पाहून व्रत सुरू केलं.

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download वैभव लक्ष्मी व्रत कथा मराठी PDF

वैभव लक्ष्मी व्रत कथा मराठी PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App