जय देवी गंगाबाई – गंगेची आरती PDF मराठी
Download PDF of Jai Devi Gangabai Gangechi Aarti Marathi
Misc ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
जय देवी गंगाबाई – गंगेची आरती मराठी Lyrics
॥ जय देवी गंगाबाई – गंगेची आरती ॥
जय देवी जय देवी जय गंगाबाई ।
पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ॥
माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी ।
हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ॥
दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी ।
हरहर आता स्मरतो गति होईल कैसी ॥
जय देवी जय गंगाबाई..
पडले प्रसंग तैशी कर्म आचरलो ।
विषयांचे मोहाने त्यातचि रत झालो ॥
ज्याचे योगे दुष्कृत-सिंधुत बुडालो ।
त्यातुनि मजला तारिसि ह्या हेतूने आलो।
जय देवी जय गंगाबाई..
निर्दय यमदूत नेती त्या समयी राखी ।
क्षाळी यमधर्माच्या खात्यातील बाकी ॥
मत्संगतिजन अवघे तारियले त्वा की ।
उरलो पाहे एकचि मी पतितांपैकी ॥
जय देवी जय गंगाबाई..
अघहरणे जय करुणे विनवितसे भावे ।
नोपेक्षी मज आता त्वत्पात्री घ्यावेम ॥
केला पदर पुढे मी, मज इतुके द्यावे ।
जीवे त्या विष्णूच्या परमात्मनि व्हावे।
जय देवी जय गंगाबाई..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowजय देवी गंगाबाई – गंगेची आरती
READ
जय देवी गंगाबाई – गंगेची आरती
on HinduNidhi Android App