Download HinduNidhi App
Misc

आगमी लिगमी – अनंताची आरती

Aagami Ligami Anantachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ आगमी लिगमी – अनंताची आरती ॥

आगमी लिगमी तुझा न कळेची अंत ।
भक्तिभावे प्रेमे भक्ता वर देत ॥
मुनिजन लक्षी लक्षिता नव्हे तू प्राप्त ।
शेष सहस्त्रमुखी वर्णिता श्रमत ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री अनंता ।
आरती ओवाळू तुज आनंद भरिता ॥ 

भाद्रपदचतुर्दशिव्रता जे जन आचरिती ।
षोडशपूजा करुनी ब्राह्मण पूजीती ॥
गोधुमवायन चौदा द्विजासि अर्पीती ।
त्यांसी सर्वहि सिद्धी देसी श्रीपती ॥

जय देव जय देव जय श्री अनंता..

कौडिण्य ब्राह्मण व्रत हे आचरला ।
करुणासागर तया प्रसन्न झाला ॥
भक्तीचा अंकूर त्रिभुवनि विस्तरला ।
एका जनार्दन चरणी नीवाला ॥

जय देव जय देव जय श्री अनंता..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download आगमी लिगमी - अनंताची आरती PDF

आगमी लिगमी - अनंताची आरती PDF

Leave a Comment