Download HinduNidhi App
Misc

बोडणाची आरती

Bodanachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ बोडणाची आरती ॥

उग्र तूझे रूप तेज हे किती ।
शशी-सुधासम असे तव कांती ॥
अष्टभुजा अष्ट आयुधे हाती ।
करिसी रिपुसंहार भक्त वंदीति ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय कुलस्वामिनी ।
आम्ही बहु अपराधी आलो तव चरणी ॥ 

पंचामृती तुज घालुनी स्नान ।
सर्व अलंकार सर्व भूषण ॥
नीलवर्ण वस्त्र करिसी परिधान ।
अंबे व्याघ्र तुजला आवडे वाहन ॥

जय देवी जय देवी जय…

नाकी तुझ्या नथ पायी पैंजण ।
जननी शक्ती आदिमाया तू पूर्ण ॥
धूप दीप कर्पूर करू आरतीला ।
पंचपक्वान्नांचा नैवेद्य तुला ॥

जय देवी जय देवी जय…

संसारतापाचे भय आम्हा भारी ।
कृपा करूनिया सर्व निवारी ॥
आमुचे मनोरथ पूर्ण तू करी ।
उमा तुझे दृढ चरण धरी ॥

जय देवी जय देवी जय…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download बोडणाची आरती PDF

बोडणाची आरती PDF

Leave a Comment