आश्विनशुद्धपक्षी अंबा – नवरातीची आरती
॥ आश्विनशुद्धपक्षी अंबा – नवरातीची आरती ॥ आश्विनशुद्धपक्षी अंबा बैसलि सिंहासनी हो । प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो । मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेउनी हो । ब्रह्माविष्णुरुद्र आईचे पूजन करिती हो ॥ १ ॥ उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो । उदोकारे गर्जती काय महिमा वर्णं तिचा हो ॥ द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो…