Download HinduNidhi App
Misc

इंद्रायणिचे तटी – ज्ञानदेवाची आरती

Indrayaniche Tati Dnyandevachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ इंद्रायणिचे तटी – ज्ञानदेवाची आरती ॥

इंद्रायणिचे तटी धरिला रहिवास ।
विश्व तारावया लक्ष्मीनिवास ॥
ज्ञानेश्वरूपे धरिला निजवेष ।
वर्म जाणे तया सद्गुरुउपदेश ॥

जय देव जय देव जय ज्ञानदेवा ॥
जीवा शिवा आदी परब्रह्म ठेवा ॥

कृष्ण एकादशी कार्तिकमासी ।
पंढरिनाथ आपण सनकादिकेसी ॥
यातेलागी येती स्वानंदराशी ।
दर्शन घडे तया निजमुक्ती देसी ॥

जय देव जय ज्ञानदेवा…

महिषीपुत्र केला वाचक वेदाचा ।
प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा ॥
विशेष अर्थ केल भगवद्गीतेचा ।
अजान वृक्ष पिंपळ शोभे कनकाचा ॥

जय देव जय ज्ञानदेवा…

सकळ सिद्धगणामाजी तू श्रेष्ठ ।
ज्ञानदेव अनुभवी ज्ञान वरिष्ठ ॥
अनुताप ज्याचा विश्व घनदाट ।
मुक्तेश्वरी न धरे प्रेमाचा लोट ॥

जय देव जय ज्ञानदेवा…

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download इंद्रायणिचे तटी - ज्ञानदेवाची आरती PDF

इंद्रायणिचे तटी - ज्ञानदेवाची आरती PDF

Leave a Comment