|| श्री संत तुकाराम महाराज आरती (प्रपंञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली) ||
प्रपंञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली ।
अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली ।।
वैराग्याची निष्ठा प्रगटुनि दाखविली ।
अहंममता दवड्डुनि निजशान्ती वरिली ।। १ ।।
जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ।। धृ ।।
हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला ।
विरक्त ज्ञानाचा ठेवा उघडुनि दाखविला ।।
जगदुद्धारालागीं उपाय सुचविला ।
निंदक दुर्जनाचा संदेह निरसीला ॥ धृ ॥ २ ॥
जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ।। धृ ।।
तेरा दिवस वह्या रक्षुनियां उदकीं ।
कोरड्याचि काढुनि दाखविल्या शेखी ।।
अपार कविताशक्ति मिणवुनि इहलोकीं ।
कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरति जन लोकीं ॥ धृ ॥ ३ ॥
जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ।। धृ ।।
Found a Mistake or Error? Report it Now