॥ लवथवती विक्राळा – शंकराची आरती ॥
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा…
देवी दैत्यी सागरमंथन पै केले ।
त्यामाजी जे अवचित हळाहळ उठिले ॥
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा…
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुलतिलक रामदासा अंतरी ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा…
Read in More Languages:- tamilஶிவ ஜீ ஆரதீ
- assameseশিৱ জী আৰতী
- odiaଶିଵ ଆରତୀ
- punjabiਸ਼੍ਰੀ ਸ਼ਿਵ ਆਰਤੀ
- kannadaಶಿವ ಆರತೀ
- gujaratiશિવ આરતી
- hindiश्री महादेव आरती
- hindiभगवान कैलासवासी आरती
- marathiशिव – शंकराची आरती
- marathiश्री शंकराची आरती
- englishShiv ji Aarti
- hindiशिव जी आरती
- teluguశివ ఆరతీ
- sanskritशिव आरती
- malayalamശിവ ആരതീ
Found a Mistake or Error? Report it Now
