Shri Vishnu

जय दीनदयाळा – सत्यनारायणाची आरती

Jai Dindayala Satyanarayanachi Aarti Marathi Lyrics

Shri VishnuAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

॥ जय दीनदयाळा – सत्यनारायणाची आरती ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ॥

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥

जय दीनदयाळा सत्यनारायण देवा…

शतानंदे विप्रं पूर्वी व्रत हें आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हैं व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥
भावार्थे पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥

जय दीनदयाळा सत्यनारायण देवा…

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥
त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥
स्मृति होउनि आचरितां व्रत त्या तुवांचि उ‌द्दिलें ॥

जय दीनदयाळा सत्यनारायण देवा…

प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णी परिसीली ॥

जय दीनदयाळा सत्यनारायण देवा…

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥
ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥

जय दीनदयाळा सत्यनारायण देवा…

अनन्यभावें पूजुनि हैं व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥

जय दीनदयाळा सत्यनारायण देवा…

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णं मी कैसा ।
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ।
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥

जय दीनदयाळा सत्यनारायण देवा…

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती PDF

Download जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती PDF

जय दीनदयाळा - सत्यनारायणाची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App