Download HinduNidhi App
Misc

जय अवधूता – दत्ताची आरती

Jai Avadhuta Dattachi Aarti Marathi

MiscAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ जय अवधूता – दत्ताची आरती ॥

जय देव जय देव जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥

तूझे दर्शन होता जाती ही पापे ।
स्पर्शनमात्रं विलया जाती भवदुरिते ॥
चरणी मस्तक ठेवुनि मनि समजा पुरते ।
वैकुंठीचे सुख नाही यापरते ॥

जय देव जय देव जय जय अवधूता..

सुगंधकेशर भाळी वर टोपीटीळा ।
कर्णी कुंडले शोभति वक्षःस्थळि माळा ॥
शरणागत तुज होता भय पडले काळा ।
तूझे दास करिती सेवासोहळा ॥

जय देव जय देव जय जय अवधूता..

मानवरूपी काया दिससी आम्हास ।
अक्कलकोटी केला यतिवेषे वास ॥
पूर्णब्रह्म तोची अवतरला खास ।
अज्ञानी जीवासी विपरीत हा भास ॥

जय देव जय देव जय जय अवधूता..

निर्गुण निर्विकार विश्वव्यापक ।
स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥
अनंत रूपे धरिसी करणे मायीक ।
तूझे गुण वर्णिता थकले विधिलेख ॥

जय देव जय देव जय जय अवधूता..

घडता अनंतजन्मसुकृत हे गाठी ।
त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥
सुवर्णताटी भरली अमृतरसवाटी ।
शरणागत दासावरि करी कृपादृष्टी ॥

जय देव जय देव जय जय अवधूता..

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download जय अवधूता - दत्ताची आरती PDF

जय अवधूता - दत्ताची आरती PDF

Leave a Comment