॥ जय देवी भगवद्गीते – गीतेची आरती ॥
जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥
आरती ओवाळू तुज वेदमाते ॥
सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची ॥
अगाध महिमा तूझ नेणे विरिची ॥
ते तू ब्रह्मी तल्लीन होसी ठायीची ॥
अर्जुनाचे भावे प्रगटे मुखीची ॥
जय देवी जय भगवद्गीते…
सात शते श्लोक व्यासोक्ती-सार ॥
अष्टादश अध्याय इतुका विस्तार ॥
एक अर्थ पाद करिता उच्चार ॥
स्मरणमात्रे त्यांचा निरसे संसार ॥
जय देवी जय भगवद्गीते…
काय तूझा पार वर्ण मी दीन ॥
अनन्यभावे तुजला आलो मी शरण ॥
सनाथ करी माये कृपा करून ॥
बाप रखुमादेवीवर दास मान ॥
जय देवी जय भगवद्गीते…
Found a Mistake or Error? Report it Now