संतमंडळी – संतांची आरती

॥ संतमंडळी – संतांची आरती ॥ आरती संतमंडळी ॥ हाती घेउनि पुष्पांजळी ॥ ओवाळीन पंचप्राणे ॥ त्यांचे चरण न्याहाळी ॥ ध्रु० ॥ मच्छेद्र गोरक्ष ॥ गैनी निवृत्तीनाथ ॥ ज्ञानदेव नामदेव ॥ खेचर विसोबा संत ॥ सोपान चांगदेव ॥ गोरा जगमित्र भक्त ॥ कबीर पाठक नामा ॥ चोखा परसा भागवत ॥ आरती संतमंडळी.. भानुदास कृष्णदास ॥…

गुरूची आरती

सगुण हे आरती निर्गुण ओवाळू ॥ कल्पनेचे घृत घालू दीप पाजळू ॥ १ ॥ ओवाळू आरती सद्गुरुनाथा, श्रीगुरुनाथा ॥ भावे चरणकमळावरी ठेविला माथा ॥ ध्रु० ॥ अविद्येचा मोह पडला उपडोनी सांडू ॥ आशा मनशा तृष्णा काम क्रोध कुरवंडू ॥ ओवाळू ॥ २ ॥ सद्गुरूचे पूजनकेले षोडशोपचारी ॥ रामानंद जीवनमुक्त झाला संसारी ॥ ओवाळू० ॥ ३…

शिव – शंकराची आरती

॥ शिव – शंकराची आरती ॥ जय जय शिव हर शंकर जय गिरिजारमणा ॥ पंचवदन जय त्र्यंबक त्रिपुरासुरदहना ॥ भवभयभंजन सुंदर स्मरहर सुखसदना ॥ अविकल ब्रह्म निरामय जय जगदुद्धरणा ॥ १ ॥ जय जय शिव हर शंकर … जय देव जय देव जय शंकर सांबा ॥ ओंवाळित निजभावें, नमितों मी सद्भावें वर सहजगदंबा ॥ ध्रु०…

शनिदेवाची आरती

जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरी ठेवा ॥ आरती ओवाळीतो । मनोभावे करुनी सेवा ॥ जय जय श्रीशनिदेवा.. सूर्यसुता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥ एकमुखे काय वर्ण । शेषा न चले स्फूर्ती ॥ जय जय श्रीशनिदेवा… नवग्रहामाजी श्रेष्ठ । पराक्रम थोर तूझा ॥ ज्यावरी तू कृपाकरिसी । होय रंकाचा राजा ॥ जय जय श्रीशनिदेवा…..

जय जगत्महरणा – सूर्याची आरती

जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिराणा । उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥ पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना । पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥ जय देव जय देव जय भास्कर सूर्या । विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ ध्रु० ॥ कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणी । सप्ताननाश्वभूषित रथि ता बैसोनी ॥ योजनसह्स्त्र द्वे द्वे शतयोजन दोनी । निमिषार्धे जग क्रमिसी अद्भुत…

त्र्यंबकेश्वराची आरती

॥ त्र्यंबकेश्वराची आरती ॥ जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो । त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥ वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो । विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा… पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥ त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥ प्रसन्न होउनि त्यातें स्नाना दिधली…

श्रीहरितालिकेची आरती

।। श्रीहरितालिकेची आरती ।। जयदेवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ।। आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ।। धृ।। हरअर्धागीं वससी । जासी यज्ञा माहेरासि ।। तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ।।१।। रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी ।। उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ।। २।। तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ।। केली बहू उपोषणें…

श्री मंगळागौरीची आरती

।। श्री मंगळागौरीची आरती ।। जय देवी मंगळागौरी । ओंवाळीन सोनियाताटीं ।। रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती ।। धृ।। मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया ।। तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ।।१।। पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा ।। सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे…

वटसावित्रीची आरती

।। वटसावित्रीची आरती ।। अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ।। अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ।। आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ।। आरती वडराजा ।। १ ।। दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ।। भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ।। धृ।। ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन…

श्री गणपतीची आरती

॥ श्री गणपतीची आरती ॥ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची। कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चन्दनाची उटि कुंकुमकेशरा। हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना…

श्री कृष्णाची आरती

॥ श्री कृष्णाची आरती ॥ ओवालू आरती मदनगोपाळा। श्यामसुन्दर गळा लं वैजयन्तीमाळा॥ चरणकमल ज्याचे अति सुकुमार। ध्वजवज्रानकुश ब्रीदाचा तोडर॥ ओवालू आरती मदनगोपाळा…॥ नाभीकमळ ज्याचेब्रह्मयाचे स्थान। ह्रीदयीन पदक शोभे श्रीवत्सलांछन॥ ओवालू आरती मदनगोपाळा…॥ मुखकमळा पाहता सूर्याचिया कोटी। वेधीयेले मानस हारपली धृष्टी॥ ओवालू आरती मदनगोपाळा…॥ जडित मुगुट ज्याच्या देदीप्यमान। तेणे तेजे कोदले अवघे त्रिभुवन॥ ओवालू आरती मदनगोपाळा…॥…

श्री शंकराची आरती

॥ श्री शंकराची आरती ॥ लवथवती विक्राळा ब्रह्माण्डी माळा। वीषे कण्ठ काळा त्रिनेत्री ज्वाळा। लावण्य सुन्दर मस्तकी बाळा। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा। आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा॥ कर्पुर्गौरा भोळा नयनी विशाळा। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा। विभुतीचे उधळण शितिकण्ठ नीळा। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा।…

श्री रामाची आरती

॥ श्री रामाची आरती ॥ त्रिभुवनमंडितमाळ गळां। आरती ओवाळूं पाहूं ब्रह्मपुतळा॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ ठकाराचे ठाण वारीं धनुष्यबाण। मारुती सन्मुख उभा कर जोडून॥ श्रीराम जय राम जय जय राम। आरती ओवाळूं पाहूं सुन्दर मेघश्यामा॥ भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती। स्वर्गाहून देव पुष्पवृष्टि करिती॥ श्रीराम जय राम जय…

श्री दुर्गा देवीची आरती

॥ श्री दुर्गा देवीची आरती ॥ दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी। अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणांते वारी। हारी पडलो आता संकट निवारी॥ जय देवी जय देवी महिषासुरमथिनी। सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी॥ त्रिभुवन-भुवनी पाहता तुज ऐसी नाही। चारी श्रमले परन्तु न बोलवे काही। साही विवाद करिता पडले प्रवाही। ते तू भक्तालागी…

श्री महालक्ष्मीची आरती

॥ श्री महालक्ष्मीची आरती ॥ जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता। कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥ जय देवी जय देवी…॥ मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं। झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी। माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी। शशिकरवदना राजस मदनाची जननी॥ जय देवी जय देवी…॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां…