नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती PDF मराठी
Download PDF of Nana Parimal Durva Shendur Shamipatre Gnapati Aarti Marathi
Shri Ganesh ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती मराठी Lyrics
|| नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती Marathi PDF ||
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowनानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती
READ
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती
on HinduNidhi Android App
DOWNLOAD ONCE, READ ANYTIME
