Hanuman Ji

जय देवा हनुमंता – मारुतीची आरती

Jai Deva Hanumanta Marutichi Aarti Marathi Lyrics

Hanuman JiAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

Join HinduNidhi WhatsApp Channel

Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!

Join Now

॥ जय देवा हनुमंता – मारुतीची आरती ॥

जय देवा हनुमंता ।
जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा ।
राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन ।
ब्रह्मचारी पवित्रा ॥

वानरूपधारी ।
ज्याची अंजनी माता ।
हिंडता वनांतरी ।
भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो समभक्त ।
ज्याने मांडिली कथा ॥

जय देवा हनुमंता…

सीतेच्या शोधासाठीं ।
रामे दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर ।
गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना ।
मुद्रा टाकिली खुणा ॥

जय देवा हनुमंता…

सीतेसी दंडवत ।
दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिले ।
मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी ।
तवं केले दहन ॥

जय देवा हनुमंता…

निजबळे इंद्रजित ।
होम करी आपण ॥
तोही त्वां विध्वसिला ।
लघुशंका करून ॥
देखोनी पळताती ।
महाभूते दारुण ॥

जय देवा हनुमंता…

राम हो लक्ष्मण ।
जरी पाताळी नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी ।
जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण ।
क्षणामाजि मर्दिले ॥

जय देवा हनुमंता…

देउनी भुभुःकार ।
नरलोक आटीले ॥
दीनानाथ माहेरा ।
त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी ।
अयोध्येसी आणिले ॥

जय देवा हनुमंता…

हनुमंत नाम तुझे ।
किती वर्ण दातारा ॥
अससी सर्वांठायी ।
हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी ।
मुक्त झाले संसारा ॥

जय देवा हनुमंता…

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App
जय देवा हनुमंता - मारुतीची आरती PDF

Download जय देवा हनुमंता - मारुतीची आरती PDF

जय देवा हनुमंता - मारुतीची आरती PDF

Leave a Comment

Join WhatsApp Channel Download App