आरती करू गोपाळा – विष्णूची आरती PDF मराठी
Download PDF of Aarti Karu Gopala Vishnuchi Aarti Marathi
Shri Vishnu ✦ Aarti (आरती संग्रह) ✦ मराठी
आरती करू गोपाळा – विष्णूची आरती मराठी Lyrics
॥ आरती करू गोपाळा – विष्णूची आरती ॥
आरती आरती करू गोपाळा ।
मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥
आवडी गंगाजळे देवा न्हाणिले ।
भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पिले ॥
अह हा धूप जाळू श्रीहरीपुढे ।
जव जव धूप जळे तव तव देवा आवडे ॥
आरती आरती करू गोपाळा..
रमावल्लभदासे अहंधूप जाळिला ।
एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥
सोह हा दीप ओवाळू गोविंदा ।
समाधी लागली पाहता मुखारविंदा ॥
आरती आरती करू गोपाळा..
हरिखें हरीख होतो मुख पाहता ।
प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥
सद्भावालागी बहु हा देव भूकेला ।
रमावल्लभदासे अहं नैवेद्य अर्पिला ॥
आरती आरती करू गोपाळा..
फल तांबूल दक्षिणा अर्पिली ।
तया उपरी नीरांजने मांडिली ॥
पंचप्राण पंचज्योति आरति उजळली ।
विश्व हे लोपले तया प्रकाशातळी ॥
आरती आरती करू गोपाळा..
आरतीप्रकाशे चंद्रसूर्य लोपले ।
सुरवर नभी तेथे तटस्थ ठेले ॥
देवभक्तपण न दिसे काही ।
ऐशापरी दास रमावल्लभा पायी ॥
आरती आरती करू गोपाळा..
Join HinduNidhi WhatsApp Channel
Stay updated with the latest Hindu Text, updates, and exclusive content. Join our WhatsApp channel now!
Join Nowआरती करू गोपाळा – विष्णूची आरती
READ
आरती करू गोपाळा – विष्णूची आरती
on HinduNidhi Android App