|| श्री सत्यनारायण महाराज आरती (काशी क्षेत्री प्रगटुनी, देसी द्विजराया) ||
काशी क्षेत्री प्रगटुनी, देसी द्विजराया ।
वाजी हस्तिक आणिख, रथधन सुजताया ॥
प्रल्हादापरी त्यावरी, केली बहुमाया ।
अंती दिली त्यासी, धननिक निजकाया ॥१॥
जयजयदेव, सत्यनारायण देवा कलीयुगी तत्क्षणी पावुन, होसी निजसेवा ॥धृ.॥
नलगे ज्योतिष शुध्दी, शास्त्रादिक शुद्धी ।
व्हावी एकच बुद्धी, त्यादिन मनीवृद्धी ॥
इच्छित जे ते देसी, मनुजा फलसिध्दी ।
तेहतीस कोटी मध्ये, युगी तत्वसिद्धी ॥२॥धृ.॥
साधु नामकवाणी, बोले निजराणी ।
देवा व्हावी मजला, संतती चोखाणी ॥
पूजीन नंतर तो, मी हरि हर्षानी ।
ऐसे मानस नमूनी, सोडी तो पावी ॥३॥धृ.॥
ऐसा तोहि साधु, घेऊनी तव नामा ।
शेवटी गेला देवा, रविकोटी धामा ॥
थकला तोहि शेष, वर्णविता महिमा ।
जेथे भक्ती जिव्हा, घेता तव नामा ॥४॥धृ.॥
अमृत कृष्णामतीने केली ही आरती ।
मजला नाही बुद्धी, स्तवनाची स्फुर्ती ॥
हृदयी बैसो देवा, कोमल ती मुर्ती ।
दिनोद्धारा देवा, त्रिभुवनी तत्कीर्ती ॥धृ.॥
Found a Mistake or Error? Report it Now