श्री संत तुकाराम महाराज आरती
|| श्री संत तुकाराम महाराज आरती (प्रपंञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली) || प्रपंञ्चरचना सर्वहि भोगूनि त्यागिली । अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धि हरविली ।। वैराग्याची निष्ठा प्रगटुनि दाखविली । अहंममता दवड्डुनि निजशान्ती वरिली ।। १ ।। जय जयाजी सद्गुरु तुकया दातारा तारक तू सकळांचा जिवलग सोयरा ।। धृ ।। हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला । विरक्त ज्ञानाचा ठेवा उघडुनि…