दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा

॥ दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची । झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥ गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी । अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य हे प्रदक्षिणा… पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी । सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य हे प्रदक्षिणा… मृदंगताघोषी भक्त भावार्थे…

घालीन लोटांगण – भजन व समर्पण

॥ घालीन लोटांगण – भजन व समर्पण ॥ घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझें । प्रेमे आलिंगिन, आनंदें पुजिन, भावें ओवाळिन म्हणे नामा ॥ त्वमेव माता व पिता त्वमेव, त्वमेव बधुश्च सखा त्वमेव । त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव ॥ कायेन वाचा मनसेन्दियैर्वा, बुद्ध्यात्मना या प्रकृतिस्वभावात । करोमि यद्यत…

नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती

॥ नानापरिमळ दूर्वा – गणपतीची आरती ॥ नानापरिमळ दूर्वा शमिपत्रे । लाडू मोदक अन्ने परिपूरित पाते ॥ ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रे ॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ॥ तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलहि पापे विघ्नेही हरती ॥…

अनंतभुजा – विठ्ठलाची आरती

॥ अनंतभुजा – विठ्ठलाची आरती ॥ आरती अनंतभुजा ॥ विठो पंढरीराजा ॥ न चालती उपचार ॥ मने सारिली पूजा ॥ आरती अनंतभुजा.. परेस पार नाही ॥ न पडे निगमा ठायी ॥ भुलला भक्तीभावे ॥ लाहो घेतला देही ॥ आरती अनंतभुजा.. अनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥ उभा राहिला नीट ॥ रामा जनार्दनी ॥ पायी जोडली वीट ॥ आरती…

मार्तंडाष्टक – खंडोबाची आरती

॥ मार्तंडाष्टक – खंडोबाची आरती ॥ त्रैलोक्यी मणिमल्ल दैत्यसकळा अजिंक्य झाले मही । त्याही ब्राह्मण यज्ञहोम हवने विध्वंसिली सर्वही ॥ आला ते समयीं सदाशिवस्वये सोडोनि ब्रह्मांड हो । तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो ॥१॥ संगे घेऊनि सप्तकोटि गण हे आला असे भूतला । खंडेराव म्हणोनिया अवगला शरत्वतेची लिला ॥ सक्रोधे मणिमल्ल मर्दुनि…

वैनतेया – गरुडाची आरती

॥ वैनतेया – गरुडाची आरती ॥ जय देव जय देव जय वैनतेया । आरती ओवाळू तुज पक्षीवया ॥ हरिवहनाऽमृतहरणा कश्यपनंदना । दिनकरसारथिबंधो खगकुलमंडना ॥ कांचनमयबाहू नाम सूपर्ण । नारायनसांनिध्ये वंद्य तू जाण ॥ जय देव जय देव जय वैनतेया.. त्वय्यारूढ होऊनि विष्णूचे गमन । मुनींद्रद्वचने केले सागरझडपन ॥ जलचरी वर्तला आकांत जाण । विनते पयोब्धीने…

श्रीशशिनाथा – चंद्राची आरती

॥ श्रीशशिनाथा – चंद्राची आरती ॥ जय देव जय देव जय श्रीशशिनाथा । आरती ओवाळू पदि ठेउनि माथा ॥ उदयी तुझ्या हृदयी शीतलता उपजे । हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे ॥ विकसित कुमुदिनि देखुनि मन ते बहु रंजे । चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय देव जय देव जय श्रीशशिनाथा.. विशेष महिमा तुझा न…

आरती करू गोपाळा – विष्णूची आरती

॥ आरती करू गोपाळा – विष्णूची आरती ॥ आरती आरती करू गोपाळा । मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥ आवडी गंगाजळे देवा न्हाणिले । भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पिले ॥ अह हा धूप जाळू श्रीहरीपुढे । जव जव धूप जळे तव तव देवा आवडे ॥ आरती आरती करू गोपाळा.. रमावल्लभदासे अहंधूप जाळिला । एका आरतीचा मा…

ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती

॥ ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती ॥ ओवाळू आरती माझ्या पंढरीराया । माझ्या पंढरीमाया ॥ सर्वभावे शरण आलो तूझिया पाया ॥ सर्व व्यापुनि कैसे रूप राहिले अकळ । रूप राहिले अकळ ॥ तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ ओवाळू आरती माझ्या… निजस्वरूप गुणातीत अवतार । धरी अवतार धरी ॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी…

जय दीनदयाळा – सत्यनारायणाची आरती

॥ जय दीनदयाळा – सत्यनारायणाची आरती ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय दीनदयाळा सत्यनारायण देवा… शतानंदे विप्रं पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें…

जय देवा हनुमंता – मारुतीची आरती

॥ जय देवा हनुमंता – मारुतीची आरती ॥ जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥ ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥ आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ वानरूपधारी । ज्याची अंजनी माता । हिंडता वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ॥ धन्य तो समभक्त । ज्याने मांडिली कथा ॥ जय देवा हनुमंता… सीतेच्या शोधासाठीं…

जय देवा दत्तराया – दत्ताची आरती

॥ जय देवा दत्तराया – दत्ताची आरती ॥ जय देवा दत्तराया ॥ स्वामी करुणालया ॥ आरती ओवाळीन ॥ तूज महाराजया ॥ प्रपंचताट करी ॥ त्रिविधताप निरंजनी ॥ त्रिगूण शुभ्रवाती ॥ उजळिल्या ज्ञान ज्योती ॥ जय देवा दत्तराया… कल्पना मंत्रपुष्प ॥ भेददक्षिणा वरी ॥ अहंभाव पूगीफल ॥ न्यून पूर्ण सकल ॥ जय देवा दत्तराया… श्रीपाद श्रीगुरुनाथा…

जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती

॥ जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती ॥ जन्मता पांडुरंगे ॥ जिव्हेवरी लिहिले ॥ अभंग शतकोटी ॥ प्रमाण कवित्व रचिले ॥ जय जयाजी भक्तराया ॥ जिवलग नामया ॥ आरती ओवाळिता ॥ चित्त पालटे काया ॥ घ्यावया भक्तिसुख ॥ पांडुरंगे अवतार ॥ धरूनिया तीर्थमिषे ॥ केला जगाचा उद्धार ॥ जय जयाजी भक्तराया.. प्रत्यक्ष प्रचीती हे ॥ वाळवंट…

ज्ञानराजा महाकैवल्यतेजा – श्रीज्ञानदेवाची आरती

॥ महाकैवल्यतेजा – श्रीज्ञानदेवाची आरती ॥ आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ लोपले ज्ञान जगीं ॥ त नेणती कोणी ॥ अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ज्ञानराजा.. कनकांचे ताट करी ॥ उभ्या गोपिका नारी ॥ नारद तुंबरु हो । साम गायन करी ॥ आरती ज्ञानराजा.. प्रगट गुह्य…

जय देवी गंगाबाई – गंगेची आरती

॥ जय देवी गंगाबाई – गंगेची आरती ॥ जय देवी जय देवी जय गंगाबाई । पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ॥ माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी । हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ॥ दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी । हरहर आता स्मरतो गति होईल कैसी ॥ जय देवी जय गंगाबाई.. पडले प्रसंग तैशी कर्म…