|| नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें आरती Marathi PDF ||
नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रें ।
लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऎसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे ।
अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी ।
कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
त्रैलोक्यी ते विजयी अदभूत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणी ।। ३ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फ़ूर्ती ।। धृ. ।।
- marathiतू सुखकर्ता – गणपतीची आरती
- marathiशेंदुर लाल चढायो – गणपतीची आरती
- marathiजय देव सुखकरमूर्ती – पंचायतनाची आरती
- marathiबाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे आरती
- englishShree Ganapati Aarti
- hindiश्री गजानन आरती
- englishShri Gajanan Aarti
- englishGajabadana Vinayaka Aarti
- gujaratiગણપતિ ની આરતી
- englishShri Ganpati Aarti
- englishShri Ganesh Aarti
- hindiगजबदन विनायक आरती
- hindiसुखकर्ता दुखहर्ता – श्री गणेश आरती
- hindiश्री गणेश आरती
- hindiआरती: श्री गणेश – शेंदुर लाल चढ़ायो
Found a Mistake or Error? Report it Now