ગણપતિ ની આરતી

|| ગણપતિ ની આરતી || જય ગણેશ જય ગણેશ જય ગણેશ દેવા | માતા જાકી પાર્વતી પિતા મહાદેવા || એકદન્ત દયાવન્ત ચાર ભુજાધારી | મસ્તક પર સિન્દૂર સોહે મૂસે કી સવારી || જય ગણેશ જય ગણેશ જય ગણેશ દેવા અન્ધન કો આંખ દેત કોઢ઼િન કો કાયા | બાંઝન કો પુત્ર દેત નિર્ધન કો માયા ||…

इंद्रायणिचे तटी – ज्ञानदेवाची आरती

॥ इंद्रायणिचे तटी – ज्ञानदेवाची आरती ॥ इंद्रायणिचे तटी धरिला रहिवास । विश्व तारावया लक्ष्मीनिवास ॥ ज्ञानेश्वरूपे धरिला निजवेष । वर्म जाणे तया सद्गुरुउपदेश ॥ जय देव जय देव जय ज्ञानदेवा ॥ जीवा शिवा आदी परब्रह्म ठेवा ॥ कृष्ण एकादशी कार्तिकमासी । पंढरिनाथ आपण सनकादिकेसी ॥ यातेलागी येती स्वानंदराशी । दर्शन घडे तया निजमुक्ती देसी…

आरती रामदासा – रामदासाची आरती

॥ आरती रामदासा – रामदासाची आरती ॥ आरती रामदासा । भक्तविरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य । उजळोनी प्रकाश ॥ साक्षात शंकराचा । अवतार मारुती ॥ कलिमाजी तेचि जाली । रामदासांची मूर्ती ॥ आरती रामदासा… वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥ जडजीवा उद्धरीले । नृप शिवासी तारिले ॥ आरती रामदासा… ब्रह्मचर्य व्रत ज्याचे । रामरूप…

नामरूपी चालक – एकनाथाची आरती

॥ नामरूपी चालक – एकनाथाची आरती ॥ नामरूपी चालक व्यापक तू एक ॥ म्हणुनी एका नामे पाचारिति लोक ॥ ज्याचे नामें न चले विषयाचा पंक ॥ जनार्दनाजवळी कीर्तीचा जनक ॥ जय देव जय देव जय एकनाथा ॥ निर्विकार ब्रह्म तूची तत्त्वता ॥ नामे भवकुंजर ताडूनी लाथा ॥ भक्तप्रतिपालक कळिकाळमाथा ॥ निर्मळ गोदातटी मुनिराज हंस ॥…

सिद्धराया – सिद्धारूढस्वामीची आरती

॥ सिद्धराया – सिद्धारूढस्वामीची आरती ॥ आरती सिद्धराया । करू द्वैत सोडोनीया ॥ आशा ममता तृष्णा-बीज । टाका तुम्ही जाळोनीया ॥ चित्सुख परात्पर । नाम सिद्धारुढ सार ॥ देव भक्त तूचि होसी । क्रीडा करिसी अपार ॥ आरती सिद्धराया… काम, क्रोध, लोभ । देही नांदती स्वयंभ ॥ हेची शत्रू दूर होता । आम्हा होसी तू…

जय माये तुळशी – तुळशीची आरती

॥ तुळशीची आरती ॥ जय देवी जय देवी जय माये तुळशी । निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळसी ॥ ब्रह्मा केवळ मूळी मध्ये तो शौरी । अग्री शंकर तीर्थ शाखापरिवारी ॥ सेवा करिती भावे सकळहि नरनारी । दर्शनमात्रे पापे हरती निर्धारी ॥ जय देवी जय माये तुळशी.. शीतल छाया भूतलव्यापक तू कैसी । मंजिरिची बहु आवड…

जय श्रीस्वामी समर्था – अक्कलकोट स्वामींची आरती

॥ जय श्रीस्वामी समर्था – अक्कलकोट स्वामींची आरती ॥ जयदेव जयदेव जय श्रीस्वामीसमर्था । आरती ओवाळू चरणी ठेवुनिया माथा ॥ छेली-खेडेग्रामी तू अवतरलासी । जगदुद्धारासाठी राया तु फिरसी ॥ भक्तवत्सल खरा तू एक होसी । म्हणूनि शरण आलो तूझे चरणासी ॥ जय श्रीस्वामीसमर्था… त्रैगुण परब्रह्म तूझा अवतार । त्याची काय वर्ण लीला पामर ॥ शेषादिक…

जय देव पंढरीराया – धूपारती

॥ जय देव पंढरीराया – धूपारती ॥ जय देव जय देव पंढरीराया ॥ धूप अर्पितसे मी भावे तव पाया ॥ सोज्ज्वळ अग्निरूपा निजतेजोराशी ॥ अहंभाव धूप कृपे जाळीसी ॥ त्याचा आनंद माझे मानसी ॥ तव दर्शनमोदे सुख हे सर्वांसी ॥ जय देव जय देव पंढरीराया… पूर्णानंद देवा तू सच्चिदानंदकंदा ॥ परमात्मा तू अससी आनंदकंदा ॥…

साईबाबाची आरती

॥ साईबाबाची आरती ॥ आरती साईबाबा । सौख्यदातारा जीवा । चरणरजतळी । द्यावा दासा विसावा । भाक्ता विसावा ॥ जाळुनिया अनंग । स्वस्वरूपी राहे दंग । मुमुक्षु जनं दावी । निज डोळा श्रीरंग ॥ आरती साईबाबा… जया मनी जैसा भाव । तया तैसा अनुभव । दाविसी दयाधना । ऐसी तुजी ही माव ॥ आरती साईबाबा……

जय देवी भगवद्गीते – गीतेची आरती

॥ जय देवी भगवद्गीते – गीतेची आरती ॥ जय देवी जय देवी जय भगवद्गीते ॥ आरती ओवाळू तुज वेदमाते ॥ सुखकरणी दुखहरणी जननी वेदांची ॥ अगाध महिमा तूझ नेणे विरिची ॥ ते तू ब्रह्मी तल्लीन होसी ठायीची ॥ अर्जुनाचे भावे प्रगटे मुखीची ॥ जय देवी जय भगवद्गीते… सात शते श्लोक व्यासोक्ती-सार ॥ अष्टादश अध्याय इतुका…

लवथवती विक्राळा – शंकराची आरती

॥ लवथवती विक्राळा – शंकराची आरती ॥ लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा । वीषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ॥ लावण्यसुंदर मस्तकी बाळा । तेथुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा ॥ जय देव जय देव जय श्रीशंकरा । आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा । अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥ विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।…

कर्पूरगौरा गौरीशंकरा – शंकराची आरती

॥ कर्पूरगौरा गौरीशंकरा – शंकराची आरती ॥ कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करू तुजला । नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ त्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठि रुंडमाळा । उग्रविषाते पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळा ॥ तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रळयाग्नीज्वाळा । नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ॥ कर्पूरगौरा गौरीशंकरा… ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगी गौरी ।…

देहत्रय निरसीत – गुरूची आरती

॥ देहत्रय निरसीत – गुरूची आरती ॥ देहत्रय निरसीत चिन्मय जे उरले ॥ ते मी ऐसे तुझिया वचने जाणवले ॥ पाचांच्या अन्वये अवघे समरसले ॥ ज्ञानादि त्रिपुटीचे भानहि मावळले ॥ जय देव जय देव सद्गुरुनाथा ॥ तव पददर्शनमात्रे हरली भवव्यथा ॥ आहे नाही पण याविरहित मी साचा ॥ माझ्या ठायी व्यापक स्थितिलय विश्वाचा ॥ तेथे…

मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती

॥ मंगलागौरी नाम तुझे – मंगळागौरीची आरती ॥ मंगलागौरी नाम तुझे ॥ तुला नमन असो माझे ॥ भवदुःखाचे हे ओझे ॥ देवी उतरावे सहजे ॥ जय माये मंगलागौरी ॥ तुजला पुजू अंतरी ॥ नानाविधि उपचारी ॥ दीप ओंवाळू सुंदरी ॥ गजाननाची तूं माता ॥ शंकराची प्रिय कांता ॥ हिमाचलाची तू दुहिता ॥ मज तारिं तारिं…

अवतार गोकुळी – कृष्णाची आरती

॥ अवतार गोकुळी – कृष्णाची आरती ॥ अवतार गोकुळी हो, जन तारावयासी । लावण्यरूपडे हो, तेजःपुंजाळ राशी ॥ उगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी । उत्साह सुरवरा, महाथोर मानसी ॥ जय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता । आरती ओवाळीन, तुम्हा देवकीसुता ॥ कौतुक पहावया, माव ब्रह्मयाने केली । वत्सेही चोरुनिया, सत्य लोकासी नेली ॥ गोपाळ, गाई, वत्से…

आरती कुंजबिहारीकी – कृष्णाची आरती

॥ आरती कुंजबिहारीकी – कृष्णाची आरती ॥ आरती कुंजबिहारीकी ॥ गिरिधर कृष्ण मुरारीकी ॥ गलेमे वैजयंतीमाला ॥ बजावे मुरलि मुरलिवाला ॥ श्रवणमे कुण्डल जगपाला ॥ नंदके नंदही नंदलाला ॥ घनसम अंगकांति काली ॥ राधिका चमक रही बिजली ॥ भ्रमरसम अलक ॥ कस्तुरीतिलक ॥ चंदसी झलक ॥ ललित सब राधे प्यारीकी ॥ गिरिधर कृष्ण मुरारीकी… क्नकमय…

ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती

॥ ओवाळू आरती मदनगोपाळा – कृष्णाची आरती ॥ ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा ॥ चरणकमल ज्याचे अति सुकुम । ध्वजवज्रांकुश चरणी ब्रीदाचा तोडर ॥ ओवाळू आरती मदनगोपाळा.. नाभिकमळी ज्याचे ब्रह्मयाचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन । ओवाळू आरती मदनगोपाळा.. मुखकमला पाहतां सूर्याच्या कोटी । वेधले मानस हारपली द्रुष्टी । ओवाळू आरती मदनगोपाळा…..

श्यामलवर्णा षड्रिपुदमना – कृष्णाची आरती

॥ श्यामलवर्णा षड्रिपुदमना – कृष्णाची आरती ॥ श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी । आरति करितो बहुप्रेमाने भवभयसंकट दूर करी ॥ दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवरतसी । भक्तकाजकल्पद्रुम म्हणुनी निशिदिनी ध्याती भक्त तुशी ॥ अतिविषधर जो काळा फणिवर कालिया यमुनाजलवासी । तत्फणिवर तू नृत्य करूनी पोचविले त्या मुक्तीसी ॥ श्यामलवर्णा षड्रिपुदमना… कैटभ चाणुर कंसादिक हे शौर्ये वधिले…

पावला प्रसाद आता – शेजारती

॥ पावला प्रसाद आता – शेजारती ॥ पावला प्रसाद आता विठो निजावे ॥ आपला तो श्रम कळो येतसे भावे ॥ १ ॥ आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा ॥ पुरले मनोरथ जातो आपुलिया स्थळा ॥ २ ॥ तुम्हासी जागविले आम्ही आपुलिया चाडा ॥ शुभाशुभ कर्मे दोष हरावया पीडा ॥ ३ ॥ तुका म्हणे दिले उच्छिष्टाचे…

पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती

॥ पंचप्राणांचे नीरांजन – निरांजन आरती ॥ पंचप्राणांचे नीरांजन करुनी । पंचतत्त्वे वाती परिपूर्ण भरुनी ॥ मोहममतेचे समूळ भिजवोनि । अपरोक्ष प्रकाश दीप पाजळोती ॥ १ ॥ जय देव जय देव जय नीरांजना । नीरांजन ओवाळू तुझिया समचरणा ॥ ध्रु० ॥ ज्वाला ना काजळी दिवस ना राती । सदोदित प्रकाश भक्तीने प्राप्ती ॥ पूर्णानंदे धालो…

भक्तीचीये पोटी – काकड आरती

॥ भक्तीचीये पोटी – काकड आरती ॥ भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती ॥ पंचप्राणे जीवे भावे ओवाळू आरती ॥ ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा । दोन्ही कर जोडुनी चरणी ठेविला माथा ॥ भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती.. काय महिमा वर्ण आता सांगणे ते किती ॥ कोटि ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥ भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती.. विटेसहित पाउले जिवे…

जय देव पांडुरंगा – दीपारती

॥ जय देव पांडुरंगा – दीपारती ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा ॥ दीपारती ओवाळू तुजला जिवलगा ॥ स्वयंप्रकाशा तुझी सर्वही दीप्ती ॥ पूर्णानंद प्राप्त करिता तव भक्ती ॥ देहत्रय वाती पाजळोनी प्रीती ॥ ओवाळितो प्रेमे देवा तुजप्रती ॥ जय देव जय पांडुरंगा.. देवा तुज पाहता येतो प्रेमपूर ॥ नाम निरंतर गाता होतो भव…

जय देव विठाबाई – नैवेद्यारती

॥ जय देव विठाबाई – नैवेद्यारती ॥ जय देव जय देव जय विठाबाई ॥ पक्वान्नादी सिद्धी अर्पी तुज ठायी ॥ षड्रसपक्वान्ने ही अर्पित तुज माई ॥ कृपा करूनी ती तू मान्य करुनि घेई ॥ तृप्ती सर्व जीवा जेविता तु आई ॥ जीवन सर्वांचे हे असे तव पायी ॥ जय देव जय विठाबाई… आनंदे भोजन करावे…

उठा पांडुरंगा आता – काकड आरती

॥ उठा पांडुरंगा आता – काकड आरती ॥ उठा पांडुरंगा आता, दर्शन द्या सकळा । झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा ॥ संत साधू मुनी अवघे, झालेली गोळा । सोडा शेजसुख आता, पाहू द्या मुखकमळा ॥ उठा पांडुरंगा आता.. रंगमंडपी महाद्वारी, झालीसे दाटी । मन उतावेळ, रूप पहावया दष्टी ॥ उठा पांडुरंगा आता.. राई रखुमाबाई, तुम्हा…

दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा

॥ दत्ताची आरती – धन्य हे प्रदक्षिणा ॥ धन्य हे प्रदक्षिणा सदगुरूरायाची । झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ॥ धृ ॥ गुरुभजनाचा महीमा नकळे अगमानिगमांसी । अनुभविते जाणति जे गुरुपदिंचे अभिलाषी ॥ धन्य हे प्रदक्षिणा… पदो पदी झाल्या अपार पुण्याच्या राशी । सर्वही तिर्थे घडली आम्हां आदिकरूनि काशी ॥ धन्य हे प्रदक्षिणा… मृदंगताघोषी भक्त भावार्थे…

अनंतभुजा – विठ्ठलाची आरती

॥ अनंतभुजा – विठ्ठलाची आरती ॥ आरती अनंतभुजा ॥ विठो पंढरीराजा ॥ न चालती उपचार ॥ मने सारिली पूजा ॥ आरती अनंतभुजा.. परेस पार नाही ॥ न पडे निगमा ठायी ॥ भुलला भक्तीभावे ॥ लाहो घेतला देही ॥ आरती अनंतभुजा.. अनिर्वाच्य शुद्धबुद्ध ॥ उभा राहिला नीट ॥ रामा जनार्दनी ॥ पायी जोडली वीट ॥ आरती…

मार्तंडाष्टक – खंडोबाची आरती

॥ मार्तंडाष्टक – खंडोबाची आरती ॥ त्रैलोक्यी मणिमल्ल दैत्यसकळा अजिंक्य झाले मही । त्याही ब्राह्मण यज्ञहोम हवने विध्वंसिली सर्वही ॥ आला ते समयीं सदाशिवस्वये सोडोनि ब्रह्मांड हो । तो हा पाहू चला कृपाजलनिधी मल्हारि मार्तंड हो ॥१॥ संगे घेऊनि सप्तकोटि गण हे आला असे भूतला । खंडेराव म्हणोनिया अवगला शरत्वतेची लिला ॥ सक्रोधे मणिमल्ल मर्दुनि…

वैनतेया – गरुडाची आरती

॥ वैनतेया – गरुडाची आरती ॥ जय देव जय देव जय वैनतेया । आरती ओवाळू तुज पक्षीवया ॥ हरिवहनाऽमृतहरणा कश्यपनंदना । दिनकरसारथिबंधो खगकुलमंडना ॥ कांचनमयबाहू नाम सूपर्ण । नारायनसांनिध्ये वंद्य तू जाण ॥ जय देव जय देव जय वैनतेया.. त्वय्यारूढ होऊनि विष्णूचे गमन । मुनींद्रद्वचने केले सागरझडपन ॥ जलचरी वर्तला आकांत जाण । विनते पयोब्धीने…

श्रीशशिनाथा – चंद्राची आरती

॥ श्रीशशिनाथा – चंद्राची आरती ॥ जय देव जय देव जय श्रीशशिनाथा । आरती ओवाळू पदि ठेउनि माथा ॥ उदयी तुझ्या हृदयी शीतलता उपजे । हेलावुनि क्षीराब्धी आनंदे गर्जे ॥ विकसित कुमुदिनि देखुनि मन ते बहु रंजे । चकोर नृत्य करिती सुख अद्भुत माजे ॥ जय देव जय देव जय श्रीशशिनाथा.. विशेष महिमा तुझा न…

आरती करू गोपाळा – विष्णूची आरती

॥ आरती करू गोपाळा – विष्णूची आरती ॥ आरती आरती करू गोपाळा । मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥ आवडी गंगाजळे देवा न्हाणिले । भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पिले ॥ अह हा धूप जाळू श्रीहरीपुढे । जव जव धूप जळे तव तव देवा आवडे ॥ आरती आरती करू गोपाळा.. रमावल्लभदासे अहंधूप जाळिला । एका आरतीचा मा…

ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती

॥ ओवाळू आरती – विठ्ठलाची आरती ॥ ओवाळू आरती माझ्या पंढरीराया । माझ्या पंढरीमाया ॥ सर्वभावे शरण आलो तूझिया पाया ॥ सर्व व्यापुनि कैसे रूप राहिले अकळ । रूप राहिले अकळ ॥ तो हा गवळ्याघरी झाला कृष्ण गोपाळ ॥ ओवाळू आरती माझ्या… निजस्वरूप गुणातीत अवतार । धरी अवतार धरी ॥ तो हा पांडुरंग उभा विटेवरी…

जय दीनदयाळा – सत्यनारायणाची आरती

॥ जय दीनदयाळा – सत्यनारायणाची आरती ॥ जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥ पंचारति ओवाळू श्रीपति तुज भक्तिभावा ॥ विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥ परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥ घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥ प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥ जय दीनदयाळा सत्यनारायण देवा… शतानंदे विप्रं पूर्वी व्रत हें आचरिलें ॥ दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें…

जय देवा हनुमंता – मारुतीची आरती

॥ जय देवा हनुमंता – मारुतीची आरती ॥ जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥ ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥ आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ वानरूपधारी । ज्याची अंजनी माता । हिंडता वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ॥ धन्य तो समभक्त । ज्याने मांडिली कथा ॥ जय देवा हनुमंता… सीतेच्या शोधासाठीं…

जय देवा दत्तराया – दत्ताची आरती

॥ जय देवा दत्तराया – दत्ताची आरती ॥ जय देवा दत्तराया ॥ स्वामी करुणालया ॥ आरती ओवाळीन ॥ तूज महाराजया ॥ प्रपंचताट करी ॥ त्रिविधताप निरंजनी ॥ त्रिगूण शुभ्रवाती ॥ उजळिल्या ज्ञान ज्योती ॥ जय देवा दत्तराया… कल्पना मंत्रपुष्प ॥ भेददक्षिणा वरी ॥ अहंभाव पूगीफल ॥ न्यून पूर्ण सकल ॥ जय देवा दत्तराया… श्रीपाद श्रीगुरुनाथा…

जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती

॥ जन्मता पांडुरंगे – नामदेवाची आरती ॥ जन्मता पांडुरंगे ॥ जिव्हेवरी लिहिले ॥ अभंग शतकोटी ॥ प्रमाण कवित्व रचिले ॥ जय जयाजी भक्तराया ॥ जिवलग नामया ॥ आरती ओवाळिता ॥ चित्त पालटे काया ॥ घ्यावया भक्तिसुख ॥ पांडुरंगे अवतार ॥ धरूनिया तीर्थमिषे ॥ केला जगाचा उद्धार ॥ जय जयाजी भक्तराया.. प्रत्यक्ष प्रचीती हे ॥ वाळवंट…

ज्ञानराजा महाकैवल्यतेजा – श्रीज्ञानदेवाची आरती

॥ महाकैवल्यतेजा – श्रीज्ञानदेवाची आरती ॥ आरती ज्ञानराजा ॥ महाकैवल्यतेजा ॥ सेविती साधुसंत ॥ मनु वेधला माझा ॥ लोपले ज्ञान जगीं ॥ त नेणती कोणी ॥ अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ज्ञानराजा.. कनकांचे ताट करी ॥ उभ्या गोपिका नारी ॥ नारद तुंबरु हो । साम गायन करी ॥ आरती ज्ञानराजा.. प्रगट गुह्य…

जय देवी गंगाबाई – गंगेची आरती

॥ जय देवी गंगाबाई – गंगेची आरती ॥ जय देवी जय देवी जय गंगाबाई । पावन करि मन सत्वर विश्वाचे आई ॥ माते दर्शनमात्रे प्राणी उद्धरसी । हरिसी पातक अवघे जग पावन करिसी ॥ दुष्कर्मी मी रचिल्या पापांच्या राशी । हरहर आता स्मरतो गति होईल कैसी ॥ जय देवी जय गंगाबाई.. पडले प्रसंग तैशी कर्म…

तुकारामाची आरती

॥ तुकारामाची आरती ॥ आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ राघवे सागरात । पाषाण तारीले ॥ तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ आरती तुकारामा.. तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ॥ म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ आरती तुकारामा..

जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना – परशुरामाची आरती

॥ जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना – परशुरामाची आरती ॥ जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना । अतिसज्जन मनमोहन रजनीकरवदना ॥ अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा । वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना ॥ जय राम श्रीरम जय भार्गवरामा । नीरांजन करु तुजला परिपूर्णकामा ॥ सह्याद्रिगिरिशिखरी शर घेउनि येसी । सोडुनि शर पळवीसी पश्चिमजलधीसी ॥ तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी । प्रताप…

सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती

॥ सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती ॥ सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥ गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥ दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द । धरथरला धरणीधर मानीला खेद…

दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती

॥ दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती ॥ आरती दत्तात्रयप्रभुची । कराची सद्भावे त्याची ॥ श्रीपदकमळा लाजविती । वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥ कटिस्थित कौपित ती वरती । छाटी अरुणोदय वरि ती ॥ वर्णं काय तिची लीला। हीच प्रसवली, मिष्ट अन्न बहुम तुष्टचि झाले, ब्रह्म क्षत्र आणि, वैश्य शूद्रही सेवुनिया जीची । अभिरुची सेवुनिया जीची ॥ आरती…

जय अवधूता – दत्ताची आरती

॥ जय अवधूता – दत्ताची आरती ॥ जय देव जय देव जय जय अवधूता । अगम्य लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ तूझे दर्शन होता जाती ही पापे । स्पर्शनमात्रं विलया जाती भवदुरिते ॥ चरणी मस्तक ठेवुनि मनि समजा पुरते । वैकुंठीचे सुख नाही यापरते ॥ जय देव जय देव जय जय अवधूता.. सुगंधकेशर भाळी…

आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती

॥ आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती ॥ आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ पद्मसम पादयुग्मरंगा । ओवाळणी होति भृंगा ॥ नखमणि स्रवताहे गंगा । जे का त्रिविधतापभंगा ॥ वर्तुळ गुल्फ भ्राजमाने ॥ किंकिणीक्वणित, नाद घणघणित, वांकिवर झुणित, नूपुरे झन्न मंजिराची । झनन ध्वनी मंजिराची ॥ आरती भुवनसुंदराची… पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंब सुस्थानी ॥ नाभिची…

अयोध्या पुरपट्टण – रामचंद्राची आरती

॥ अयोध्या पुरपट्टण – रामचंद्राची आरती ॥ अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरी । अवतरले श्रीराम कौसल्येउदरी ॥ स्वानंदे निर्भर होती नरनारी । आरति घेउनि येती दशरथमंदीरी ॥ जय देव जय देव जय श्रीरामा । आरती ओवाळू तुज पूर्णकामा ॥ पुष्पवृष्टी सुरवर गगनीहुनि करिती । दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीती ॥ अप्सरा गंधर्व गायने करिती ।…

रत्नांची कुंडले – रामचंद्राची आरती

॥ रत्नांची कुंडले – रामचंद्राची आरती ॥ रत्नांची कुंडले माला सुविराजे ॥ झळझळ गंडस्थळ घननीळ तनु साजे ॥ घंटा किंकिणि अंब्र अभिनव गति साजे ॥ अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे ॥ जय देव जय देव रघुवर ईशा ॥ आरती निजरवर ईशा जगदीशा ॥ राजिवलोचन मोचन सुरवर नरनारी ॥ परात्पर अभयअक्र शंकर वरधारी ॥ भूषणमंडित…

जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती

॥ जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती ॥ जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ॥ नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे । जय देव जय देव जय आत्मारामा… बहुरूपी बहुगुणी बहुता…

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती

॥ त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती ॥ त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा । आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥ ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम जय राम जय जय राम… भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि…

उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती

॥ उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती ॥ उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ जय एव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनी त्राहाटीला ।…