Download HinduNidhi App
Shri Krishna

अवतार गोकुळी – कृष्णाची आरती

Avatar Gokuli Krushnachi Aarti Marathi

Shri KrishnaAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ अवतार गोकुळी – कृष्णाची आरती ॥

अवतार गोकुळी हो, जन तारावयासी ।
लावण्यरूपडे हो, तेजःपुंजाळ राशी ॥
उगवले कोटीबिंब, रवि लोपला शशी ।
उत्साह सुरवरा, महाथोर मानसी ॥

जय देवा कृष्णनाथा, राई रखुमाईकांता ।
आरती ओवाळीन, तुम्हा देवकीसुता ॥

कौतुक पहावया, माव ब्रह्मयाने केली ।
वत्सेही चोरुनिया, सत्य लोकासी नेली ॥
गोपाळ, गाई, वत्से दोही ठायी रक्षिली ।
सुखाचा प्रेमसिंधू, अनाथांची माउली ॥

जय देवा कृष्णनाथा..

चारिता गोधले हो, इंद्र कोपला भारी ।
मेघ जो कडाडीला, शिळा वर्षल्या धारी ॥
रक्षिले गोकुळ हो, नखी धरिला गिरी ।
निर्भय लोकपाळ, अवतरले हरी ॥

जय देवा कृष्णनाथा..

वसुदेव देवकीची, बंद फोडिली शाळ ।
होऊनिया विश्वजनिता, तया पोटिचा बाळ ॥
दैत्य हे त्रासियेले, समूळ कंसासी काळ ।
राज्य दे उग्रसेना, केला मथुरापाळ ॥

जय देवा कृष्णनाथा..

तारिले भक्तजन, दैत्य सर्व निर्दाळून ।
पांडवा सहकार अडलिया निर्वाणी ॥
गुण मी काय वर्ण, मति केवढी वानू ।
विनवितो दास तुका, ठाव मागे चरणी ॥

जय देवा कृष्णनाथा..

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download अवतार गोकुळी - कृष्णाची आरती PDF

अवतार गोकुळी - कृष्णाची आरती PDF

Leave a Comment