तुकारामाची आरती

॥ तुकारामाची आरती ॥ आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा ॥ सच्चिदानंद मूर्ती । पाय दाखवी आम्हा ॥ राघवे सागरात । पाषाण तारीले ॥ तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिले ॥ आरती तुकारामा.. तुकिता तुलनेसी । ब्रह्म तुकासी आले ॥ म्हणोनि रामेश्वरे । चरणी मस्तक ठेविले ॥ आरती तुकारामा..

जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना – परशुरामाची आरती

॥ जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना – परशुरामाची आरती ॥ जमदग्नीकुळभूषण मुक्ताफळदशना । अतिसज्जन मनमोहन रजनीकरवदना ॥ अगणित महिमा तुझा न कळे सुरगणा । वदतो कंठी वाणी सरसीरुहनयना ॥ जय राम श्रीरम जय भार्गवरामा । नीरांजन करु तुजला परिपूर्णकामा ॥ सह्याद्रिगिरिशिखरी शर घेउनि येसी । सोडुनि शर पळवीसी पश्चिमजलधीसी ॥ तुजसम रणधीर जगी न पडे दृष्टीसी । प्रताप…

सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती

॥ सत्राणे उड्डाणे – मारुतीची आरती ॥ सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी ॥ गडबडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १ ॥ जय देव जय देव जय हनुमंता । तुमचे नि प्रसादे न भी कृतांता ॥ दुमदुमिली पाताळे उठिला प्रतिशब्द । धरथरला धरणीधर मानीला खेद…

दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती

॥ दत्तात्रयप्रभुची – दत्ताची आरती ॥ आरती दत्तात्रयप्रभुची । कराची सद्भावे त्याची ॥ श्रीपदकमळा लाजविती । वर्तुल गुल्फ रम्य दिसती ॥ कटिस्थित कौपित ती वरती । छाटी अरुणोदय वरि ती ॥ वर्णं काय तिची लीला। हीच प्रसवली, मिष्ट अन्न बहुम तुष्टचि झाले, ब्रह्म क्षत्र आणि, वैश्य शूद्रही सेवुनिया जीची । अभिरुची सेवुनिया जीची ॥ आरती…

जय अवधूता – दत्ताची आरती

॥ जय अवधूता – दत्ताची आरती ॥ जय देव जय देव जय जय अवधूता । अगम्य लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ तूझे दर्शन होता जाती ही पापे । स्पर्शनमात्रं विलया जाती भवदुरिते ॥ चरणी मस्तक ठेवुनि मनि समजा पुरते । वैकुंठीचे सुख नाही यापरते ॥ जय देव जय देव जय जय अवधूता.. सुगंधकेशर भाळी…

आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती

॥ आरती भुवनसुंदराची – कृष्णाची आरती ॥ आरती भुवनसुंदराची । इंदिरावरा मुकुंदाची ॥ पद्मसम पादयुग्मरंगा । ओवाळणी होति भृंगा ॥ नखमणि स्रवताहे गंगा । जे का त्रिविधतापभंगा ॥ वर्तुळ गुल्फ भ्राजमाने ॥ किंकिणीक्वणित, नाद घणघणित, वांकिवर झुणित, नूपुरे झन्न मंजिराची । झनन ध्वनी मंजिराची ॥ आरती भुवनसुंदराची… पीतपट हाटकतप्तवर्णी । कांची नितंब सुस्थानी ॥ नाभिची…

अयोध्या पुरपट्टण – रामचंद्राची आरती

॥ अयोध्या पुरपट्टण – रामचंद्राची आरती ॥ अयोध्या पुरपट्टण शरयूचे तीरी । अवतरले श्रीराम कौसल्येउदरी ॥ स्वानंदे निर्भर होती नरनारी । आरति घेउनि येती दशरथमंदीरी ॥ जय देव जय देव जय श्रीरामा । आरती ओवाळू तुज पूर्णकामा ॥ पुष्पवृष्टी सुरवर गगनीहुनि करिती । दानव दुष्ट भयभीत झाले या क्षीती ॥ अप्सरा गंधर्व गायने करिती ।…

रत्नांची कुंडले – रामचंद्राची आरती

॥ रत्नांची कुंडले – रामचंद्राची आरती ॥ रत्नांची कुंडले माला सुविराजे ॥ झळझळ गंडस्थळ घननीळ तनु साजे ॥ घंटा किंकिणि अंब्र अभिनव गति साजे ॥ अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे ॥ जय देव जय देव रघुवर ईशा ॥ आरती निजरवर ईशा जगदीशा ॥ राजिवलोचन मोचन सुरवर नरनारी ॥ परात्पर अभयअक्र शंकर वरधारी ॥ भूषणमंडित…

जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती

॥ जय देव आत्मारामा – रामचंद्राची आरती ॥ जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे ॥ नाना तीर्थी क्षेत्री अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडी गाजे । जय देव जय देव जय आत्मारामा… बहुरूपी बहुगुणी बहुता…

त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती

॥ त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे – रामचंद्राची आरती ॥ त्रिभुवनमंडितमाळ शोभतसे गळा । आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा ॥ श्रीराम जय राम जय जय राम । आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम ॥ ठकाराचे ठाण करी धनुष्यबाण । मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ श्रीराम जय राम जय जय राम… भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळिती । स्वर्गीहूनी देव पुष्पवृष्टि…

उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती

॥ उत्कट साधुनि शिळा – रामचंद्राची आरती ॥ उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ जय एव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्णकामा ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनी त्राहाटीला ।…

जय देव सुखकरमूर्ती – पंचायतनाची आरती

॥ जय देव सुखकरमूर्ती – पंचायतनाची आरती ॥ जय देव जय देव सुखकरमूर्ती । गणपति शिव हरि भास्कर अंबा सुखमूर्ती ॥ अघसंकट भयनाशन सुखदा विघ्नेशा । आद्या सुरवरवंद्या नरवारणवेषा ॥ पाशांकुशधर सुंदर पुरविसी आशा । निजपद देउनि हरिसी भ्रांतीच्या पाशा ॥ जय देव जय देव सुखकरमूर्ती… नंदीवाहना गहना पार्वतिच्या रमणा । मन्मथदहना शंभो वातात्मजनयना ॥…

जय देवी मंगळागौरी – मंगळागौरीची आरती

॥ जय देवी मंगळागौरी – मंगळागौरीची आरती ॥ जय देवी मंगळागौरी ॥ ओवाळीन सोनियाताटी ॥ रत्नांचे दिवे ॥ माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥ मंगळमूर्ती उपजली कार्या ॥ प्रसन्न झाली अल्पायुषी ॥ राया तिष्ठली राजबाळी ॥ अहेवपण द्यावया ॥ जय देवी मंगळागौरी.. पूजेला ग आणिती जाईच्या कळ्या ॥ सोळा तिकटी सोळा दूर्वा ॥ सोळा…

संत सनकादिक – विठ्ठलाची आरती

॥ संत सनकादिक – विठ्ठलाची आरती ॥ संत सनकादिक भक्त मिळाले अनेक ॥ स्वानंदे गर्जती पाहू आले कौतुक ॥ नवल होताहे आरती देवाधिदेवा ॥ स्वर्गीहूनि सुरवर पाहू येताति भावा ॥ नवल होताहे आरती… नरनारी तटस्थ अवघे पडले नयना ॥ ओंवाळिता श्रीमुख धणी न पुरे मना ॥ नवल होताहे आरती… एका जनार्दनी मंगल कौतुके गाती ॥…

युगे अठ्ठावीस – विठ्ठलाची आरती

॥ युगे अठ्ठावीस – विठ्ठलाची आरती ॥ युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥ पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥ जय देव जय देव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥ तुळसीमाळा गळा कर ठेवुनि कटी । कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी…