Download HinduNidhi App
Shri Vishnu

आरती करू गोपाळा – विष्णूची आरती

Aarti Karu Gopala Vishnuchi Aarti Marathi

Shri VishnuAarti (आरती संग्रह)मराठी
Share This

॥ आरती करू गोपाळा – विष्णूची आरती ॥

आरती आरती करू गोपाळा ।
मी तू पण सांडोनी वेळोवेळा ॥

आवडी गंगाजळे देवा न्हाणिले ।
भक्तीचे भूषण प्रेमसुगंध अर्पिले ॥
अह हा धूप जाळू श्रीहरीपुढे ।
जव जव धूप जळे तव तव देवा आवडे ॥

आरती आरती करू गोपाळा..

रमावल्लभदासे अहंधूप जाळिला ।
एका आरतीचा मा प्रारंभ केला ॥
सोह हा दीप ओवाळू गोविंदा ।
समाधी लागली पाहता मुखारविंदा ॥

आरती आरती करू गोपाळा..

हरिखें हरीख होतो मुख पाहता ।
प्रगटल्या ह्या नारी सर्वहि अवस्था ॥
सद्भावालागी बहु हा देव भूकेला ।
रमावल्लभदासे अहं नैवेद्य अर्पिला ॥

आरती आरती करू गोपाळा..

फल तांबूल दक्षिणा अर्पिली ।
तया उपरी नीरांजने मांडिली ॥
पंचप्राण पंचज्योति आरति उजळली ।
विश्व हे लोपले तया प्रकाशातळी ॥

आरती आरती करू गोपाळा..

आरतीप्रकाशे चंद्रसूर्य लोपले ।
सुरवर नभी तेथे तटस्थ ठेले ॥
देवभक्तपण न दिसे काही ।
ऐशापरी दास रमावल्लभा पायी ॥

आरती आरती करू गोपाळा..

Read in More Languages:

Found a Mistake or Error? Report it Now

Download HinduNidhi App

Download आरती करू गोपाळा - विष्णूची आरती PDF

आरती करू गोपाळा - विष्णूची आरती PDF

Leave a Comment